सचिनने शोमध्ये यावं, यासाठी कपिलच्या टीमने सर्वोतोपरी प्रयत्न केले. कपिल शर्माचा सहकारी सुनील ग्रोव्हरने शोला रामराम ठोकल्यापासून या शोची लोकप्रियता कमी झाल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सचिनच्या निमित्ताने या शोला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळण्याची शक्यता होती. मात्र तसं झालं नाही.
'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'चं प्रमोशन कोणत्याही हिंदी कार्यक्रमात केलं जाणार नाही, असं सचिनने अगोदरच प्रोडक्शनला सांगितल्याचं बोललं जातं. त्यामुळेच सचिन कपिलच्या शोमध्येही दिसला नाही. दरम्यान सचिनने प्रमोशनसाठी मराठी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, शिवाय मराठी वृत्तवाहिन्यांनाही मुलाखत दिली आहे.
'सचिन ए बिलीयन ड्रीम्स' हा सिनेमा आज हिंदी आणि मराठीसह इतर भाषेतही रिलीज झाला. राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
व्हिडिओ : EXCLUSIVE : बायोपिकनिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी दिलखुलास गप्पा