प्रभासच्या बर्थडेला 'साहो' चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2017 01:43 PM (IST)
अॅक्शन-थ्रिलर साहो चित्रपटात प्रभास सोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय झळकणार आहेत.
मुंबई : बाहुबली स्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आगामी 'साहो' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रभासच्या वाढदिवासाचा मुहूर्त साधत हा लूक लाँच करण्यात आला आहे. साहो चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर प्रभासचं अत्यंत गूढ रुप पाहायला मिळत आहे. प्रभासचा चेहरा अर्धा झाकलेला असून त्याचे फक्त डोळेच दिसत आहेत. साहोच्या फर्स्ट लूकमधून चित्रपटाच्या मूडचा अंदाज चाहते बांधत आहेत.