मुंबई : सुपर-डुपर हिट चित्रपट 'बाहुबली'चा प्रमुख अभिनेता प्रभासचा आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. 23 ऑक्टोबर 1979 रोजी जन्मलेल्या प्रभासने तेलुगु सिनेमातून सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता बॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. 'बाहुबली'नंतर जगभरात त्याच्या फॅनफॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. आज प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल माहित नसलेल्या 15 गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत...


1 'बाहुबली' प्रभासचं खरं नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी आहे. प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'ईश्वर' या तेलुगु सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती.

2 प्रभासने एका हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. अजय देवगणच्या 'अॅक्शन जॅक्सन'मधील एका गाण्यात तो दिसला होता. आता ह्याला बॉलिवूड पदार्पण म्हणायचं की नाही ही वेगळी बाब, पण तो हिंदी चित्रपटात दिसला होता.

3 प्रभास दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील पहिला कलाकार आहे, ज्याचा मेणाचा पुतळा बँकॉकमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये आहे. हा पुतळा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपातील आहे.

4 प्रभासची कौटुंबीक पार्श्वभूमी सिनेमाची आहे. त्याचे वडील सूर्यनारायण राजू निर्माते आहेत. तर काका उप्नापती कृष्णम राजू टॉलिवूड स्टार आहेत.

5 आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो.

6 अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची भूमिका साकारणारा प्रभास खऱ्या आयुष्यात इंजिनीअर आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केलं आहे.

7 आज लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभासला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं होतं. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता.

8 प्रभासचा आवडता पदार्थ चिकन बिर्याणी आहे.

9 प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '3 इडियट्स' 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.

10 अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख आणि सलमान त्याचे हे आवडते कलाकार आहेत. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.

11 'बाहुबली'साठी प्रभास एवढा डेडिकेटेड होता की, त्याने चार वर्ष एकही चित्रपट स्वीकारला नाही.

12 इतकंच नाही तर प्रभासने 5.5 कोटी रुपयांची जाहिरातही नाकारली. कारण त्याला बाहुबलीवर लक्ष केंद्रीत करायचं होतं.

13 बाहुबलीमुळे प्रभासने अजून लग्न केलेलं नाही. आतापर्यंत त्याने 6000 लग्नाचे प्रस्ताव धुडकावले आहेत.

14 बाहुबली सिनेमासाठी बलदंड शरीर कमावण्यासाठी प्रभासने घरातच व्हॉलीबॉल कोर्ट बनवलं होतं, जेणेकरुन तो कधीही वर्कआऊट करु शकतो आणि आवडता खेळही एन्जॉय करु शकतो.

15 बाहुबलीसाठी प्रभासने 30 किलो वजन वाढवलं होतं. चार वर्ष हा लूक कायम ठेवणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. या चार वर्षांत त्याने प्रचंड चिकन आणि अंडी खाल्ली होती.