पणजी : गोव्यात सुरु असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये बहुचर्चित 'एस. दुर्गा' या चित्रपटाचा खेळ होणार नाही. तांत्रिक कारण पुढे करत इफ्फीमधून हा चित्रपट बाहेर काढला आहे. इफ्फीच्या शेवटच्या दिवशी चित्रपटाचा एक तरी खेळ होईल अशी अपेक्षा होती.
सनलकुमार शशिधरन दिग्दर्शित 'एस. दुर्गा' आणि रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' हे दोन्ही चित्रपट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या यादीतून वगळले होते. त्यावरुन 'एस.दुर्गा'चे निर्माते, दिग्दर्शक कोर्टात गेले होते. त्यानंतर केरळच्या हायकोर्टाने हा चित्रपट इफ्फीत दाखवण्याचा आदेश दिला होता. तरीही शेवटच्या दिवसापर्यंत हा चित्रपट इफ्फीत दाखवला जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं.
इफ्फीमध्ये 'एस दुर्गा' दाखवा, केरळ हायकोर्टाचा आदेश
सोमवारी रात्री इफ्फीतल्या ज्युरींसाठी या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सात ज्युरींनी चित्रपट दाखवण्यास मंजुरी दिली होती, तर चार ज्युरींनी मात्र नापसंती दर्शवली.
त्यानंतर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या चित्रपटाचा एखादा खेळ होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आता समारोप सोहळ्याचे वेध लागले असून 'एस. दुर्गा' दाखवला जाणार नाही, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, रोटरडॅम 2017 च्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला हिवोस टायगर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
इफ्फीच्या शेवटच्या दिवशीही 'एस. दुर्गा'चा शो नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2017 03:59 PM (IST)
सोमवारी रात्री इफ्फीतल्या ज्युरींसाठी या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सात ज्युरींनी चित्रपट दाखवण्यास मंजुरी दिली होती, तर चार ज्युरींनी मात्र नापसंती दर्शवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -