Akshay Kumar Latest Post : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडामध्ये आहे. शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता त्याने हे शूटिंग पूर्ण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.


खिलाडी कुमारचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Akshay Kumar Photo Viral On Social Media)


अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोतील अक्षयच्या पाठीवरील टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.अक्षयने त्याच्या पाठीवर मुलाच्या नावाचा नावाचा म्हणजे 'आरव' असं लिहिलेला टॅटू काढला आहे. 






अक्षय कुमारने शर्टलेस फोटो शेअर करत लिहिलं आहे,"देवभूमीत एका कमाल सिनेमाचं  शूटिंग पूर्ण केलं आहे. मी आता उत्तराखंडाच्या प्रेमात पडलो आहे. पुन्हा उत्तराखंडाला भेट देण्याची इच्छा आहे". खिलाडी कुमारच्या या फोटोवर पाजी कमाल, बॉलिवूडचा खरा खिलाडी, पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप-खूप शुभेच्छा, हर हर महादेव, बॉस, जय देवभूमी, जय उत्तराखंड, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Akshay Kumar Upcoming Project)


अक्षय कुमारचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. सध्या तो अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा 'सेल्फी' (Selfie) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. या सिनेमात तो इमरान हाशमीसोबत झळकला होता.


खिलाडी कुमार आता 'बडे मिया छोटे मिया' (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. खिलाडीच्या चाहत्यांना आता या सिनेमाची उत्सुकता आहे. अक्षयचा 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. अक्षय कुमार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.


संबंधित बातम्या


Selfiee OTT Release : खिलाडी कुमारचा 'सेल्फी' आता घरबसल्या पाहा; जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर झाला रिलीज...