मुंबईः बॉक्स ऑफिसवर 12 ऑगस्ट रोजी दोन दमदार सिनेमे रिलीज होत आहेत. अक्षय कुमारचा 'रुस्तम' आणि हृतिक रोशनचा 'मोहेंजोदरो' यांची येत्या शुक्रवारी टक्कर होत आहे. अक्षय आणि हृतिकने दोन्हीही सिनेमांना यश मिळावं, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 

 

अक्षय कुमार आणि हृतिक रोशन या दोघांनाही या क्लॅशबद्दल विचारण्यात आलं. दोघांनीही नेहमीच्या शैलीत उत्तरं दिली. हृतिक रोशनचा बिग बजेट सिनेमा 'मोहंजोदरो' कमाईत बाजी मारणार, की 'रुस्तम' चांगली कमाई करणार याबद्दल दोन्ही अभिनेत्यांनी मजेशीर उत्तर दिली.

 

कमाईत कोण बाजी मारणार?

 

'मोहेंजोदरो'मध्ये आपण फक्त अभिनेता आहोत. 'रुस्तम'मध्ये अक्षय कुमार अभिनेता आणि निर्माता दुहेरी भूमिकेत आहे, असं सांगत हृतिकने विनम्र प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे अक्षय कुमारनेही दोन्ही सिनेमांना यश मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली.

 

 

'रुस्तम' आणि 'मोहेंजोदरो' च्या रिलीलजा मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आहेत. स्वातंत्र्य दिन, रक्षा बंधन आणि विकेंड असा योग या सिनेमांना जूळून येत आहे. त्यामुळे प्रेक्षक दोन्हीही सिनेमांना पसंती देतील, असा विश्वास अक्षय कुमारने व्यक्त केला आहे. 'लगान' आणि 'गदर-एक प्रेम कथा' हे दोन सिनेमे देखील एकाच दिवशी रिलीज झाले होते. दोन्हीही सिनेमांनी चांगलं यश मिळवलं होतं, असं उदाहरणही अक्षय कुमारने दिलं.

 

 

शाहरुख खानचा 'दिलवाले' आणि संजय लीला भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' सिनेमा काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी रिलीज झाला होता. यामध्ये शाहरुख खानच्या 'दिलवाले'ने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली. तर 'बाजीराव मस्तानी'ला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.