Junior NTR In Hrithik Roshan War 2 : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या 'वॉर 2' (War 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनचा 'वॉर' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या दुसऱ्या भागात 'आरआरआर' (RRR) फेम ज्युनियर एनटीआर (Junior NTR) झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 


'वॉर 2' या सिनेमासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद नव्हे तर अयान मुखर्जी सांभाळणार आहेत. यशराज फिल्मसच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 






हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज!


पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार,'वॉर 2' या सिनेमात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्क्रीन शेअर करणार आहेत. या अॅक्शनचा तडका असलेल्या सिनेमात प्रेक्षकांना हृतिक आणि ज्युनियर एनटीआरचा अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. 'वॉर'प्रमाणे 'वॉर 2' हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. 


सलमानच्या 'Tiger 3' नंतर प्रदर्शित होणार 'वॉर 2'


यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत निर्मिती होत असलेला सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानंतर 'वॉर 2' (War 2) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. पण बॉक्स ऑफिसवर 'वॉर 2' चांगलाच गल्ला जमवणार असे म्हटले जात आहे. 


यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा सिनेमा 'वॉर 2' आहे. 'वॉर 2' (War 2), 'टायगर 3' (Tiger 3) आणि 'टायगर वर्सेज पठाण' (Tiger Vs Pathaan) हे तीन यशराज फिल्म्सच्या स्पाय सुनिव्हर्समधील आगामी सिनेमे आहेत. या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Yash Raj Films Spy Universe: पठाणनंतर आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नावं माहितीयेत?