Oscar 2023 : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्याचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमध्ये आरआरआर (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळालं आहे. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर गायक राहुल सिप्लिगंज (Rahul Sipligunj) आणि काला भैरव (Kaala Bhairava) हे दोन कलाकार परफॉर्म करणार आहेत.
द अॅकेडमीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "राहुल सिप्लिगंज आणि काला भैरव यांचे नाटू नाटू गाणे 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये लाइव्ह पाहता येईल. ABC वर तुम्ही ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी (12 मार्च) पाहू शकता." आता राहुल सिप्लिगंज आणि काला भैरव यांच्यासोबतच नाटू नाटू गाण्यावर ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण देखील परफॉर्म करतील का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
12 मार्चला लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
'नाटू-नाटू' गाण्याचं युक्रेनमध्ये झालं शूटिंग
'नाटू-नाटू' या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निवासस्थानाबाहेर या गाण्याचं शूटिंग झालं आहे. ऑस्करआधी 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात (Golden Globe Awards 2023) सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग मोशन पिक्चर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला होता. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला होता. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले होते की, ठहा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे."
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: