RRR: दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. या चित्रपटाच्या कथानकाचं, चित्रपटातील गाण्यांचे आणि चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX चं परदेशातील प्रेक्षकांनी देखील कौतुक केलं. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं लोकप्रिय ठरलं आहे. आता या गाण्याची क्रेझ पाकिस्तानात देखील दिसत आहे. नुकताच एका अभिनेत्रीचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला. 


पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरचा (Hania Aamir) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हानिया ही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये ती 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक केलं असून काही युझर्सनं या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 


हानिया आमिरच्या व्हिडीओला नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


'हा डान्स आहे की एक्सरसाइज सेशन, यात रिदम देखील नाही.', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं हानिया आमिरच्या व्हिडीओला केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'हे काय आहे?'


पाहा व्हिडीओ: 






हानिया आमिर ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. लोड वेडिंग, सुपरस्टार यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तसेच तिला तितली, दिलरुबा, मेरे हमसफर या मालिकांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 


'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. या गाण्यातील  ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण  यांच्या डान्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ram Charan : राम चरणने आनंद महिंद्रा यांना शिकवली 'नाटू नाटू'ची हूकस्टेप; व्हिडीओ होतोय व्हायरल