Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'रूप नगर के चीते' हा सिनेमा 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विहान सूर्यवंशीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. 'रूप नगर के चीते' या सिनेमाच्या माध्यमातून मैत्रीचा एक वेगळा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर? याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा जवळचा मित्र गरजेचा असतो. त्याचंही म्हणणं ऐकणं महत्त्वाचं असतं, याच मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


'रूप नगर के चीते'ची कथा काय? 


सध्याच्या जगात मैत्रीची व्याख्या जरी तीच असली तरी तीचं स्वरुप बदलताना दिसतंय. या चित्रपटातूनही मैत्रीमधला वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे. दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.


'रूप नगर के चीते' हा सिनेमा प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल असा विश्वास सिनेमातील कलाकारांनी व्यक्त केला आहे. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते ती जपणे महत्त्वाचे असल्याचे सांगत हा सिनेमा प्रत्येकाला निखळ आनंद देईल असं दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितलं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बॉलीवूड सारखी भव्यता अनुभवायला मिळेल असं निर्माते मनन शाह यांनी सांगितलं.


ट्रेलर पाहा : 



संबंधित बातम्या


Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; कलाकारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन


Roop Nagar Ke Cheetey : ‘होऊन जाऊ दे’ गाण्याचा सोशल मीडियावर बोलबाला! एका दिवसांत मिळवले 2 मिलियन व्हूज!