लॉस एंजेलिस : जागतिक चित्रपटसृष्टीमधील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठीची नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. 24 फेब्रुवारी रोजी 91 वा ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहेत. यंदाच्या ऑस्कर नामांकनांमध्ये ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ या दोन चित्रपटांना प्रत्येकी दहा-दहा नामांकनं मिळाली आहेत. मानाची बाहुली मिळवण्यासाठी या दोन चित्रपटांमध्ये मोठी चढाओढ आपल्याला पहायला मिळणार आहे.

ऑस्कर मिळणं जितकं कौतुकास्पद आहे. तितकंच त्याचं नामांकन मिळणंदेखील मोठा सन्मान आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात ‘ब्लॅक पॅन्थर’, ‘ब्लॅक क्लान्झमन’, ‘दी बोहेमियन रॅप्सोडी’, ‘दी फेव्हरिट’, ‘ग्रीन बुक’, ‘रोमा’, ‘अ स्टार इज बॉर्न’, ‘व्हाइस’ या चित्रपटांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत नामांकन मिळवणारा ब्लॅक पॅन्थर हा पहिला सुपरहिरो चित्रपट ठरला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट : ब्लॅक पँथर, ब्लॅक क्लान्झमन, दी बोहेमियन रॅप्सोडी, द फेव्हरिट, ग्रीन बुक, रोमा, अ स्टार इज बॉर्न, व्हाइस

सर्वोत्कृष्ट अभिनेता : ख्रिश्चियन बेल - व्हाइस, ब्रॅडले कुपर - अ स्टार इज बॉर्न, विल्यम डॅफो- अ‍ॅट, इटर्निटीज स्टेट, रामी मॅलेक- बोहेमियन राप्सोडी, व्हिगो मॉर्टेन्सन- ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : यालित्झा अपॅरिशियो -रोमा, ग्लेन क्लोज - द वाइफ, ऑलिव्हिया कोलमन- द फेव्हरिट, लेडी गागा - अ स्टार इज बॉर्न, मेलिसा मॅकार्थी - कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी,

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : स्पाइक ली- ब्लॅकक्लान्झमन, पावेल पावलीकोवस्की- कोल्ड वॉर, योरगॉस लँथीमोस- द फेव्हरिट, अल्फान्सो क्वारोन - रोमा, अ‍ॅडम मॅक्के- व्हाइस

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अ‍ॅमी अ‍ॅडम्स- व्हाइस, मरिना डी ताविरा- रोमा, रेगिना किंग- इफ बियल स्ट्रीट क्लाउड टॉक, एमा स्टोन- द फेवरिट, रेचल वेझ- द फेव्हरिट

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : महेर्शला अली- ग्रीन बुक, अ‍ॅडम ड्रायव्हर- ब्लॅकक्लान्झमन, सॅम इलिय- अ स्टार इन बॉर्न, रिखर्ड ई ग्रांट - कॅन यू एव्हर फरगिव्ह मी, सॅम रॉकवेल- व्हाइस

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर, ख्रिस्तोफर रॉबिन, फर्स्ट मॅन, रेडी प्लेअर वन, सोलो : अ स्टार वॉर्स स्टोरी