Rohit Shetty: 'गोलमाल (Golmaal), सिंघम (Singham) 'सिम्बा' (Simmba) आणि 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) यांसारख्या सुपरहिट चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या चित्रपटांनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. रोहित हा अॅक्शनचा तडका असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करतो. त्याच्या चित्रपटामधील अॅक्शन आणि कॉमेडी सिन्सला प्रेक्षकांची पसंती मिळते. आता लवकरच रोहितची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजचं नाव 'इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)'  असं आहे. या सीरिजच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ रोहितनं शेअर केला. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


रोहितनं शेअर केला व्हिडीओ
रोहितनं त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याच्या हातात माईक दिसत आहे. रोहित 'अॅक्शन' म्हणताच त्याच्या समोर मोठा स्फोट होतो. त्याच प्रमाणे एक ड्रोन देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला रोहितनं कॅप्शन दिलं, 'नवीन वर्षाचा निश्चय, काहीही झाले तरी चालेल पण साधे, सरळ काम करायचे नाही'


रोहितनं शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन मिलियनपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे, तर अनेकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. रश्मी देसाई, वरुण शर्मा या सेलिब्रिटींना या व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ: 






इंडियन पोलीस फोर्स 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज 


'इंडियन पोलीस फोर्स' ही रोहित शेट्टीची आगामी वेब वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रोहितच्या या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सीरिजच्या माध्यमातून रोहित ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. 


रोहित शेट्टी हा  'इंडियन पोलीस फोर्स' च्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याला कामिनेनी (Kamineni) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला देखील दुखापत झाली होती. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Waltair Veerayya Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर चिरंजीवींची जादू; जाणून घ्या 'वॉलटेर वीरय्या' चं कलेक्शन