Rohit Shetty : सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित शेट्टी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' (Indian Police Force) या वेबसीरिजचं शूटिंग करत होता. एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली आहे. 


रोहित शेट्टीला कामिनेनी (Kamineni) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शस्त्रक्रियेनंतर रोहित उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 






अॅमेझॉन प्राइमच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वेबसीरिजचं शूटिंग सुरू आहे. रोहित आधी या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थलादेखील किरकोळ दुखापत झाली होती. रोहित आणि सिद्धार्थ दोघेही या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहेत. सिद्धार्थसह या सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि शिल्पा शेट्टीदेखील (Shilpa Shetty) मुख्य भूमिकेत आहेत. 


अॅक्शनपटांचा बादशाह रोहित शेट्टी!


रोहित शेट्टी हा अॅक्शन पटांसाठी ओळखला जातो. त्याच्या सिनेमांत प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत असतो. 'सिंघम', 'दिलवाले' आणि 'सूर्यवंशी' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या दिग्दर्शनाची जादू पाहायला मिळाली आहे. रोहितला अॅक्शनपट करायला आवडतात. 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही तो स्टंट करताना दिसला आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra : रोहित शेट्टीची Cirkus रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात; रणवीर सिंह सादर करणार स्किट