Rocky Aur Rani Kii Prem Kahaani OTT Release: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)  यांचा   'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे? याबाबत जाणून घेऊयात...


रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)  या चित्रपटामधील  आलिया आणि रणवीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता थिएटर रिलीजच्या जवळपास दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.


करण जोहर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली आहे.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन  करण जोहरनं कॅप्शनमध्ये लिहिलं,"रॉकी आणि राणी यांची प्रेम कहानी पाहण्यासाठी सज्ज व्हा!  रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहा अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime)"


 22 सप्टेंबर रोजी Amazon Prime  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला आहे.  काही दिवसांसाठी हा चित्रपट  वर रेंटवर उपलब्ध होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रेक्षक हा चित्रपट Amazon Prime वर मोफत पाहू शकतात.






रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाची स्टार कास्ट


रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये  आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबत धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.  'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Twitter Review:  कसा आहे आलिया आणि रणवीर यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ? वाचा ट्विटर रिव्ह्यू