Raja Shivaji Film : महाराष्ट्राचा 'लाडका भाऊ' अभिनेता रितेश देशमुख आता लवकरच 'राजा शिवाजी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही रितेश देशमुखने सांभाळली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचा सुपरहिट मराठी चित्रपट 'वेड' प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरला. या चित्रपटाला ओटीटीवरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहे. या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार आहेत.


छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुख


अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणू त्याचा दुसरा मराठी चित्रपट 'राजा शिवाजी' घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्याचा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना साइन केलं आहे.


'हे' 3 बॉलिवूड अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका


रितेश देशमुख या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच या चित्रपटाच्या दिग्दर्शनही करणार आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,  अभिषेक आणि फरदीन मुघलांच्या भूमिकेत दिसतील तर रितेश पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसेल. तर, अभिषेक बच्चन, फरदीन खान आणि संजय दत्त मुघल शासकांच्या भूमिकेत दिसतील. जा शिवाजी' चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. रितेशने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा केली होती.


राजा शिवाजी चित्रपटाचं शुटिंग जोरात सुरु


'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, 'इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज... हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे... प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.'




'वेड'नंतर दुसऱ्यांदा रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेत


रितेश देशमुखने चित्रपट 'वेड' चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. 'वेड' चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशने केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. ओटीटीवरही याचा धमाका पाहायला मिळाला. या चित्रपटाची निर्माती रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखने केली होती. अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटी रुपयांची कमाई केली. 'वेड' हा 2019 च्या हिट तेलुगू चित्रपट 'माजिली' चा मराठी रिमेक आहे. 'माजिली'मध्ये समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पुष्पा 2 - दंगलचा रेकॉर्डब्रेक... 9 दिवसांत 7000 कोटी कमाई करणारा चित्रपट; बॉक्स ऑफिसवर रचला नवा विक्रम