Riteish Deshmukh: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. रितेशचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या काही महिन्यांपूर्वी रिलजी झालेल्या वेड या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाली. नुकतीच रितेशनं एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी रितेशनं विविध विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये रितेशला 'राजकारणात एन्ट्री करणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला रितेशनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.


काय म्हणाला रितेश? 


'रितेशचं प्रेम कशावर आहे, राजकारण की सिनेमा?'असा प्रश्न नुकत्याच एका कार्यक्रमात रितेशला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत रितेश म्हणाला,  राजकारण. पुढे रितेशला मुलाखतीत विचारण्यात आलं की, तुला राजकारणात एन्ट्री करायची आहे का? यावर रितेश म्हणाला, 'राजकारणात यायचंय असं मी म्हणालो नाही पण राजकारण हे माझं पहिलं प्रेम आहे. राजकारणा विषयी माझी आवड आणि आपुलकी आहे. '  रितेशला पुढे विचारण्यात आलं, 'म्हणजे तू कधी राजकारणात जाणार नाही?' या प्रश्नाचं उत्तर देत रितेश म्हणाला, 'भविष्यात काय होईल काहीच माहित नसतं.'


रितेशचे चित्रपट


तुझे मेरी कसम या चित्रपटामधून रितेशनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.मस्ती, क्या कूल है हम, हे बेबी,धमाल,हाऊसफुल्ल,एक व्हिलन यांसारख्या चित्रपटात त्यानं प्रमुख भूमिका साकारली. तसेच त्याच्या माऊली, लय भारी या मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 






रितेशचा वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात  रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. वेड या चित्रपटामधील वेड लावलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ved On OTT: रितेश- जिनिलियाचा 'वेड' आता ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? जाणून घ्या