मुंबई : अभिनेता अमेय वाघची भूमिका असलेल्या 'फास्टर फेणे' चित्रपटाचा दुसरा टीझर लाँच झाला आहे. रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक-ट्विटरवर हा टीझर पोस्ट केला आहे. रितेश आणि जेनेलिया डिसुझा-देशमुखने या चित्रपटाची निर्मिती केली असून 27 ऑक्टोबरला फास्टर फेणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे या व्यक्तिरेखेवर हा आधारित चित्रपटाची कथा क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे, तर आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

अमेय वाघ बनेश फेणे अर्थात फास्टर फेणेच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'स्मार्ट नव्या दुनियेला साहसी हे देणे, नव्या रुपात नव्या कथेत आला फास्टर फेणे' अशी टॅगलाईन चित्रपटाला देण्यात आली आहे. 'झी स्टुडिओज'ने हा चित्रपट रसिकांसाठी आणला आहे.

'सॉलिड डोकं, शोधक नजर, श्वास रोखून बघा, आलाय नवा टीझर' अशा कॅप्शनसह सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. भास्कर रामचंद्र भागवत यांनी साठच्या दशकात लिहिलेलं फास्टर फेणे हा पात्र प्रचंड गाजलं होतं. फास्टर फेणेच्या चित्तथरारक कथांनी लहानग्यांना भुरळ पाडली होती. ती मॅजिक पुन्हा दिसणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

https://twitter.com/Riteishd/status/911500762194182144