या सिनेमाचा ट्रेंड वर्ल्डवाईड असून सोशल मीडियावर ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. या सिनेमात अजय देवगण, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, नील नीतिन मुकेश यांची मुख्य भूमिका आहे. तर तब्बू आणि परिणीती चोप्रा या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील.
'गोलमान अगेन' हा हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे. गोलमान सीरिजच्या जुन्या सिनेमांमधील अनेक सीन्स या सिनेमात असण्याची शक्यता आहे. गोलमाल सीरिजचे यापूर्वीचे सिनेमे हिट ठरल्यानंतर आता प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
2006 साली 'गोलमाल : फन अनलिमिटेड' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 2008 साली 'गोलमाल रिटर्न्स' हा सिनेमा आला, तर 2010 साली 'गोलमान 3' या सिनेमाने प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. आता रोहित शेट्टी सात वर्षांनंतर या सीरिजमधील पुढील सिनेमा घेऊन येत आहे.
सिनेमाचा टीझर :