Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे.
रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".
स्वतःचा एखादा शॉट शूट केल्यानंतर ते स्वत: बघायला यायचे. त्यांना तो शॉट आवडला नाही तर ते पुन्हा नव्या जोशात तो शॉट देत असत. खऱ्या अर्थाने कॅप्टन ऑफ द शिप म्हणण्याजोग काम त्यांनी केलंय. एखादा शॉट शूट करण्याआधी ते आपल्या टीम सोबत चर्चा करत असे. प्रत्येक शॉटसाठी ते मेहनत घेत होते. आम्हाला त्यांच्याकडून सतत नव-नवीन गोष्टी शिकता आल्या".
रोहन पुढे म्हणाला,"रितेश देशमुख यांचं नाव खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना दडपन होतं. पण त्यांनी ते आम्हाला कधीच जाणवू दिले नाहीत. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना एखादया उमद्या दिग्दर्शक ज्याप्रमाणे काम करेल त्याचपद्धतीने रितेश देशमुख यांनी काम केलं. 'वेड' या सिनेमाच्या दिग्दर्शन टीममधील प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य होतं. त्यामुळे सर्वच मंडळी एकमेकांकडून काही ना काही शिकत होते".
'वेड' या सिनेमाच्या सेटवरचं वातावरण खूपच चांगलं होतं. कौटुंबिक वातावरण निर्माण झालं होतं. 'वेड' या सिनेमातील अनेकांचा हा पहिलाच बिग बजेट सिनेमा आहे. पण आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा अनेकांचा पहिला सिनेमा आहे हे कुठेही जाणवत नाही. जिनिलिया देशमुख या सिनेमाच्या निर्मात्या होत्या. प्रोडक्शन टीम खूप चांगली होती. तक्रार करण्यासाठी त्यांनी जागा ठेवली नाही. शूटिंग करतांना ज्या ज्या उणिवा जाणवत होत्या त्या त्या प्रत्येकजण स्वतःहुन पुढाकार घेऊन पूर्ण करत असत.
शूटिंगदरम्यान रितेश-जिनिलियाला पाहायला चाहत्यांची तुडूंब गर्दी
'वेड' या सिनेमाचं अलिबागला शूटिंग सुरू होतं. या शूटिंगदरम्यान रितेश-जिनिलियाला पाहायला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या चाहत्यांना सांभाळणं खूप अवघड जात होतं. बॉडीगार्डदेखील कमी पडले होते. त्यावेळी सिनेमातील वेगवेगळ्या डीपार्टमेंटमधील मंडळी रितेश देशमुखसाठी पुढे आली आणि त्यांनी गर्दी कमी करण्यास मदत केली.
'वेड' या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केलं आहे. तर प्रतीक पाटील, अभय राऊत, सागरिका जोशी, रोहन कोतेकर आणि रितीक कदम यांनी या सिनेमाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या