Riteish Deshmukh Genelia Deshmukh On Vilasroa Deashmukh Birth Anniversary : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasroa Deshmukh) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे. 


रितेश देशमुखची पोस्ट काय आहे? (Riteish Deshmukh Post)


रितेश देशमुखने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याची दोन्ही मुलं विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर उभी असलेली दिसत आहेत. रितेशने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"जेव्हा मला हताश वाटतं, आता यापुढे आपलं काहीही होऊ शकत नाही असं वाटतं, पराभव झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी त्या खडतर काळात मी विचार करतो की, मी कुणाचा मुलगा आहे. हा एक सकारात्मक विचार मला जग जिंकण्यासाठी प्रेरणा देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा... तुमची दररोज आठवण येते". 






काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाही : जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh Post)


जिनिलीया देशमुखने सोशल मीडियावर मुलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं विलासराव देशमुख यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत जिनिलीयाने लिहिलं आहे,"काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा... प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते". 






रितेश-जिनिलीयाच्या पोस्टवर, आम्हाला तुमची आठवण येते साहेब... लातूरची शान आमची जान, साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, प्रेरणास्थान, जगुया स्वप्ने साहेबांची, एक आदरणीय व्यक्तिमत्त्व, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील बाभळगावात विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. काँग्रेस नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेश देशमुख आणि विलासराव देशमुख यांच्यात मैत्रीचं नातं होतं. 14 ऑगस्ट 2012 रोजी चेन्नईत त्यांचं निधन झालं. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 26 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!