Kangana Ranaut Tweet : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. पंगाक्वीन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडत असते. त्यामुळे अनेकदा ती ट्रोल होते. आता शॉट्स घालून मंदिरात गेलेल्या मुलीची कंगनाने ट्वीट करत शाळा घेतली आहे. तसेच तिने स्वत:चा एक किस्साही शेअर केला आहे. 


ट्वीटरवर शॉर्ट्समध्ये हिमाचलमधील बैजनाथ शिव मंदिरात जातानाचा एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत यूजरने लिहिलं आहे,"हिमाचलमधील लोकप्रिय शिव मंदिर बैजनाथचा हा फोटो आहे. एखाद्या पब किंवा नाईट क्लबमध्ये गेल्याप्रमाणे या मंदिरात ही मुलगी जात आहे. याला माझा तीव्र विरोध आहे. हा फोटो पाहून मी विचारसरणी पुढारलेली नाही असं म्हटलं तरी चालेल". 


'पंगाक्वीन'ने घेतली शाळा (Kangana Ranaut Tweet)


यूजरच्या ट्वीटला रिट्विट करत कंगनाने लिहिलं आहे,"मुलीने परिधान केलेले वेस्टर्न कपडे आहेत. तिने पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं आहे. एकदा मी व्हॅटिकनमध्ये होते आणि मी शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलं होतं. त्यावेळी मला कॅम्पसमध्येही प्रवेश दिला जात नव्हता. शॉर्ट्समध्ये मंदिरात प्रवेश करणारी ही आळशी आणि मूर्ख मुलगी आहे. अशा मुर्खांसाठी कडक नियम असायला हवेत". 






कंगना रनौत मनालीमध्ये लहाणाची मोठी झाली आहे. हिमाचल प्रदेशातील संस्कृतीबद्दल ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. नुकतीच ती हरिद्वारला गेली होती. तेथील फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये ती गंगा नदी काठी बसलेली दिसून आली होती. 


कंगना रनौतचा 'इमरजेन्सी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात काम करण्यासोबत ती दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळणार आहे. या सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातील तिची पहिली झलक समोर आली आहे. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut: PVR Inox चे 50 थिएटर होणार बंद, कंगनानं दिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'चित्रपटगृहांची गरज...'