Riteish Deshmukh And Genelia Deshmukh:  महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (14 ऑगस्ट) पुण्यतिथी आहे.  14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले. नुकतीच विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच रितेशची पत्नी जिनिलियानं (Genelia Deshmukh) देखील इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 


जिनिलियाची पोस्ट


जिनिलयानं विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रिय पप्पा, मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की,  तुमचा विचार करणे खूप छान आहे. पण तुमच्याशिवाय जगणे इतके कठीण आहे. मला खात्री आहे की, तुम्ही जिथे असलात ती जागा नक्कीच खास असले कारण तुमच्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची क्षमता आहे. आम्हाला तुमची आठवण येते पप्पा."






रितेशनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं, 'मिस यू पप्पा'






26 मे 1945 रोजी बाभळगावात विलासराव देशमुख  (Vilasrao Deshmukh)  यांचा जन्म झाला. लातूरमधील मराठवाडा भागातील विलासराव देशमुख हे एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते. विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं.  


रितेश आणि जिनिलिया यांचे चित्रपट


रितेश अनेक वेळा सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.  काही महिन्यांपूर्वी रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. तसेच जिनिलियाचा ट्रायल पीरियड हा चित्रपट 21 जुलै रोजी जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.रितेश आणि जिनिलिया यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. या दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.


संबंधित बातम्या


Riteish Deshmukh Genelia Deshmukh : "आता यापुढे आपलं काहीही होऊ शकत नाही"; विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेश-जिनिलीयाची खास पोस्ट