मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमासोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जात आहे. सोनम कपूरच्या विवाहसोहळ्यात हा प्रकार घडल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स आहे.
ऋषी कपूर यांचा चिडका स्वभाव आणि उद्धटपणाची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. त्यातच 'चिंटू' साहेबांनी थेट सलमान खानशी पंगा घेतला. सलमानने नीट गळाभेट न घेतल्याच्या रागातून ऋषी कपूरनी सीमा यांच्याशी गैरवर्तन केलं.
ही बाब समजताच सलमान खान प्रचंड चिडला होता. सलमान खानने पार्टीमध्ये ऋषी कपूरची शोधाशोध केली, मात्र तोपर्यंत ऋषी कपूर यांनी काढता पाय घेतला होता.
अखेर मिसेस कपूर म्हणजेच नीतू सिंग यांनी मध्यस्थी करत खान मंडळींची माफी मागितली. मात्र दोन कुटुंबांमधले तणावाचे संबंध अद्याप निवळले नसल्याचं म्हटलं जातं.