Rishi Kapoor Last Wish : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) हे हयातीत नसले तरी त्यांच्या आठवणी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात कायम आहे.  ऋषी कपूर यांचे कुटुंबीय अनेकदा त्यांच्याबद्दल काही ना काही शेअर करत असतात. आपल्या आवडत्या स्टारबद्दल न ऐकलेल्या गोष्टी ऐकून चाहते खूश होतात. ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात. एका रिॲलिटी शोमध्ये नीतू कपूरने ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा सांगितली होती. ऋषी कपूर हयातीत असताना त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली असे नीतू कपूर यांनी सांगितले. 


ऋषी कपूर यांच्या निधनाच्या काही महिन्यानंतर नीतू कपूर यांनी  पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम  केले होते.  नीतू कपूर यांनी डान्स दिवाने ज्यूनिअर या रिएलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी या शोच्या एका एपिसोडमध्ये ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा सांगितली होती. 


ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा कोणती?


रिएलिटी शो मध्ये  ऋषी कपूर यांच्या अपूर्ण इच्छेबद्दल सांगताना  नीतू कपूर यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांची शेवटची एक इच्छा होती, जी अपूर्ण राहिली. त्यांना रणबीरचा विवाह पाहायचा होता. ज्यावेळी रणबीरचा विवाह पार पडत होता, त्यावेळी मी त्यांची इच्छा पूर्ण होताना पाहत होते आणि ऋषी कपूरदेखील त्यांची इच्छा असलेला रणबीरचा विवाह हा कुठून तरी पाहत असतील असे मला वाटले.






रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह 14  एप्रिल 2022 रोजी झाला. रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा साधेपणाने घरीच पाडला होता. या विवाह सोहळ्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रांनी सहभागी झाली होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.रणबीर-आलिया या दाम्पत्याला राहा नावाची मुलगी आहे.


राहासोबत ऋषी कपूरसोबतचा फोटो झाला होता व्हायरल


 






राहाचा ऋषी कपूरसोबतचा एडिट केलेला फोटो  सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये राहा तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्या मांडीवर दिसत आहे. हा फोटो पाहून कपूर कुटुंब भावूक झाले. नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनीही हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या एडिटेड फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता.