जाहिरात विश्वालाही रिंकू राजगुरुने 'याड लावलं'....
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2016 03:22 AM (IST)
मुंबई : सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने जाहिरात विश्वालाही 'याड लावलं' आहे. रिंकूने नुकतंच 'गो' एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाचं प्रॉडक्ट लाँच केलं. गजानन ग्रुपच्या 'गो' या तेलाच्या ब्रँडचं उद्घाटन रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याला सुप्रसिद्ध संगीतकार जतिनही उपस्थित होते. त्यामुळे पुढे-मागे रिंकू जाहिरातीत दिसणार का असा सवालही विचारला जात आहे.