मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलेल्या जबाबात रिया चक्रवर्तीने बॉलिवूडमधील 25 कलाकारांची नावे घेतल्याची माहिती आहे. यात बॉलिवूडमधील दोन नवोदित कलाकारांची नावं समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बॉलिवूड मधील बड्या कलाकारांची नावे समोर येणार असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या प्रकरणामध्ये बॉलिवूडला ड्रग्स पोहचवणारे ड्रग्स डीलर देखील एनसीबीच्या रडारवर आहेत. एनसीबीने करमजीत नावाच्या ड्रग्स पेडलरसह 4 अन्य सप्लायरला अटक केली आहे. यांच्या माध्यमातूनच एनसीबी बॉलीवूड मधील दिग्गजांपर्यंत पोहचण्याचा पर्यंत करत आहे.


सुशांत सिंग प्रकरणांमध्ये ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू केला. या तपासात रियाने बॉलिवूड मधील काही कलाकारांची नावं घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला रियाने सांगितलं की बॉलीवूडमधील काही कलाकार तिच्यासोबत ड्रग्स घेत होते. तसे पुरावेही त्यांना रियाच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये सापडले आहेत. नेमकं काय म्हटलं आहे रियाने तिच्या जबाबात.


NDPS 67 च्या जबाबात रियाचा खुलासा




  • आपल्या जबाबात रियाने बॉलिवूड मधील 25 जणांची नावे घेतली आहेत. जे ड्रग्सशी संबंधित आहेत. तिने सुशांतसोबत ड्रग्सचं सेवन करत असल्याची कबुली देखील दिली आहे. रियाच्या जबाबानुसार बॉलीवूडमधील काही लोकं सुशांत बरोबर ड्रग्सचं सेवन करत होती. बॉलिवूड मधील ही लोकं सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसमध्ये येत होती.

  • सुशांत बायपोलर असल्याचंही रियाने एनसीबीला सांगितलं. सुशांतवर उपचार करणाऱ्या पाच डॉक्टरांची नावंही रियाने NCB ला सांगितली आहे. या डॉक्टरांचा जबाब सीबीआयने सुद्धा नोंदवला आहे. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की एक वेळा सुशांत हिंदुजा रुग्णालयात दाखल होता.

  • सुशांत 2018 मध्ये युरोप टूर सोडून परत आला होता. नंतर माझ्या घरी येऊन सुशांतने ड्रग्सच सेवन केलं. 2016 ते 2018 पर्यंत सुशांत मुंबईच्या ज्या फ्लॅटमध्ये राहत होता. ( केप्री हाईट्स) त्या फ्लॅटचं सत्य सुद्धा रियाने सांगितलं. तिथेसुद्धा सुशांत ड्रग्स घेत होता.

  • 20 पानांच्या जबाबामध्ये रियाने फक्त स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दलच नाहीतर बॉलिवूड मधील घडामोडींबद्दल सुद्धा सांगितलं. सुशांत सोबत सुरू झालेल्या मैत्रीपासून ते प्रेम प्रकरणापर्यंत सर्वकाही त्यात आहे. फिल्ममेकर सुशांतला पार्टीमध्ये घेऊन जात होते आणि त्या पार्टीमध्ये काय-काय केलं जात होतं. या मध्ये KJ नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे, ज्याचा तपास NCB करत आहेत.

  • शोविक चक्रवर्तीने सुद्धा रिया आणि ड्रग्सचा संबंध असल्याची कबुली दिली आहे. शोविकने मान्य केलं की ड्रग्ससाठी रिया पैसे द्यायची आणि कधी कधी रियाच्या अकाउंट मधूनच किंवा तिच्या डेबिट कार्डने ड्रग्ससाठी शोविकला पैसे मिळत होते. तर सॅम्युअलने पण शोविकच्या जबाबाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे रियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.


बॉलिवूडमधील दिग्गज सुशांतसोबत ड्रग्ज घेत होते, रियाकडून दोन प्रसिद्ध अभिनेत्यांच्या नावाचा उल्लेख