सुझानने याबाबत ट्विट करुन हृतिक आणि आपल्याबाबत तर्कवितर्क लढवण्याचं बंद करा, असं आवाहन केलं आहे.
"लोकांनी कृपया तर्कवितर्क लढवणं बंद करावं, अशी माझी विनंती आहे. हृतिकशी पुन्हा जवळीक होणार नाही. पण आम्ही नेहमी चांगले पालक राहू, आणि त्यालाच प्राधान्य असेल" असं ट्विट सुझानने केलं आहे.
सध्या हृतिक रोशन आणि कंगना रानौत यांच्यात कायदेशीर लढाई सुरु आहे. मात्र या लढाईदरम्यान हृतिकला त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने पाठिंबा दिला आहे. तसंच नुकतंच हृतिक-सुझानचा मुलगा रिधानच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे एकत्र पाहायला मिळाले होते.
त्यामुळे सोशल मीडियावर हृतिक आणि सुझान खान यांच्यातील वाढत्या जवळीकीबद्दल वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. तसेच अनेकदा सुझानला याबद्दल विचारलंही जात होतं. शेवटी सुझैनने वैतागून ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.
हृतिक- सुझानचा काडीमोड
परस्परातील मतभेदांमुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझानच्या वैवाहिक आयुष्याचा काडीमोड झाला. हृतिक आणि सुझानचे गेल्या 17 वर्षांपासूनचे संबंध संपुष्टात आले आहेत.
कहो ना प्यार है या चित्रपटानंतर, हृतिक - सुझानचा 20 डिसेंबर 2000 रोजी विवाह झाला होता. त्यांना रेहान (7) आणि रिधान (5) अशी दोन मुलं आहेत.