दोघांचं नातं आता संपुष्टात आलं आहे. याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. इतकंच नाही तर सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवणं यामीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. आई-वडिलांचं ऐकूनच यामीने पुलकित सम्राटशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.
शिमलामध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पुलकित आणि यामी यांच्यातील नातं बहरलं. त्याचवेळी यामी आणि पुलकितची पत्नी श्वेता रोहिरा यांच्यात वाद झाला होता. यामी घर मोडणारी महिला असल्याचं श्वेता म्हणाली होती. यानंतर पुलकित आणि श्वेता यांचा घटस्फोट झाला.
दरम्यान, श्वेता ही अभिनेता सलमान खानची मानलेली बहिण आहे.