अभिनेत्री पूजा डडवाल टीबीग्रस्त, सलमानकडे मदतीची याचना
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2018 10:17 PM (IST)
पूजा डडवाल सध्या टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी लढत आहे. आर्थिक मदतीसाठी तिने सलमान खानशी संपर्क केला होता
मुंबई : सुपरस्टार सलमान खानने अनेक नवोदित अभिनेत्री, स्टारकिड्स यांचं करिअर घडवलं आहे. सलमानसोबत 'वीरगती' चित्रपटात झळलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीशी झुंज देत आहे. आर्थिक मदतीसाठी तिने सलमान खानलाही संपर्क केला पण सलमानकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पूजा डडवाल सध्या टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी लढत आहे. पूजाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की तिच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. गेल्या 15 दिवसांपासून ती मुंबईतील शिवडीमधल्या रुग्णालयात दाखल आहेत. सहा महिन्यांपूर्वी पूजाला टीबीचं निदान झालं. आजारापणात पूजाला तिचा नवरा आणि कुटुंबियांनीही वाऱ्यावर सोडलं आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आर्थिक मदतीसाठी तिने सलमान खानलाही संपर्क केला पण सलमानकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पूजाने आपला व्हिडिओ तयार केला असून तो पाहून सलमान संपर्क करेल, असा विश्वास तिला वाटतो. गेली काही वर्ष पूजा गोव्यात कॅसिनो मॅनेजमेंट करत होती. मात्र आपल्याकडे एकही पैसा नसल्याचा दावा तिने केला आहे. चहा पिण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागत असल्याचं पूजा सांगते. पूजाने हिंदुस्तान, इंतकाम, सिंदूर की सौगंध यासारख्या चित्रपटातही काम केलं आहे. पाहा व्हिडीओ