मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसत आहे. कालपासून दिलीप कुमार उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


गेल्या 4 दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलीप कुमार यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असले तरीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता कायम असून डॉक्टरांची स्पेशल टीम दिलीपकुमार यांच्यावर उपचार करत आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

अभिनेते दिलीप कुमार यांना युरिन इन्फेक्शन आणि डिहायड्रेशनमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.