Aamir Khan And Reena Dutta: बॉलिवूडचा (Bollywood Actor) मिस्टर परफेक्शनिस्ट, आमिर खान (Aamir Khan). बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी आणि त्याच्या प्रवाहाविरुद्धच्या विचारांसाठी आमिर खान ओळखला जातो. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्तानं (Reena Dutta) तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध आमिर खानशी लग्न केलं. बॉलिवूडमधल्या गाजलेल्या प्रेमकहाण्यांपैकी रीना आणि आमिर यांची प्रेमकहाणी. पण, आजही बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा आहे, ज्यांचा शेवट खरंच खूप वेदनादायी होता. काहीजणांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी घटस्फोट न घेताच वेगवेगळं राहू लागले. अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांचा घटस्फोट झालाय, यावर विश्वास ठेवणं कठिण झालं आहे. असंच काहीसं आमिर आणि रीना यांच्याबाबत आहे. कारण दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. यामध्ये घरच्यांची समजूत काढण्यापासून दोघांचं करियर दाव्यावर लावण्यापर्यंत सगळं काही समाविष्ठ आहे.
नाती बनवणं आणि तोडणं हे बॉलिवूडमध्ये काही नवं नाही. इंडस्ट्रीत दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींच्या प्रेमप्रकरणाच्या आणि ब्रेकअपच्या बातम्या व्हायरल होत असतात. काही वर्षांपूर्वी आमिर खान आणि रीना दत्ता यांनी त्यांच्या कुटुंबाविरुद्ध जात एकमेकांचा स्विकार केला आणि लग्नानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीही असंच काहीसं झालं. मात्र, त्याकाळी हवाई दलातील एका अधिकाऱ्याच्या मुलीनं मुस्लिम अभिनेत्याशी लग्न करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती.
वडिलांच्या विरोधात जाऊन केलं आमिरसोबत लग्न
आमिर खान आणि रिना दत्त यांनी 18 एप्रिल 1986 रोजी गुपचुप रजिस्टर्ड मॅरेज केलं. दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या नात्यामुळे अजिबात खूष नव्हते. कारण, दोघांचा धर्म वेगवेगळा होता. रीना हिंदू आणि आमिर मुस्लिम... त्यात रीना एयरफोर्स ऑफिसरची मुलगी. तिच्या वडिलांसाठीही मुलीसाठी हे पाऊल उचलणं फारसं सोपं नव्हतं. पण, काहीकाळानं आमिरच्या कुटुंबीयांनी हे लग्न मान्य केलं होतं. पण, रीनाच्या कुटुंबानं मात्र, दोघांचं लग्न कधीच मान्य केलं नाही.
एक वर्षांचं रिलेशनशिप आणि त्यानंतर लग्न
आमिर खान आणि रीना दत्ता यांचं अफेअर फक्त एक वर्ष चाललं. एक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी रिनाच्या वडिलांना मुलीच्या लग्नाबाबत समजलं, त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसला. 2001 मध्ये आमिरचा लगान चित्रपट रिलीज झाला होता. या दरम्यान आमिर आणि रीना यांच्या काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं. लगानच्या शुटिंगदरम्यान आमिर आणि फिल्म असिस्टेंट प्रोड्यूसर किरण राव (Kiran Rao) यांच्यातील जवळीक वाढल्याचं रीनाला समजल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर 2002 मध्ये आमिर खान आणि रीना यांचा घटस्फोट झाला. दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत संसार थाटला. आज रीना दत्ता 56 वर्षांची आहे आणि वयाच्या या टप्प्यावरही त्या एकट्यानं आयुष्य जगत आहेत.
दरम्यान, आमिर आणि रीना या दोघांना दोन मुलं (मुलगा जुनैद आणि मुलगी इरा) आहेत. त्यानंतर 2005 मध्ये आमिर खाननं किरण रावशी दुसरं लग्न केलं. दोघांनाही आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. हे नातंही लग्नाच्या 15 वर्षानंतर तुटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :