मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विशेष दखल घ्यायला भाग पाडलं आहे. प्रियंकाने अमेरिकेतील एका इव्हेंटला परिधान केलेला कोट सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. मात्र सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.
राल्फ लॉरेनच्या आयकॉनिक ट्रेंच कोटवरुन प्रेरणा घेत प्रियंकाने लांबलचक कोट न्यू यॉर्कच्या मेट गालामध्ये परिधान केला होता. या कोटचं वैशिष्ट्य म्हणजे तो निव्वळ पायघोळ नाही, तर त्याहीपेक्षा लांबलचक आहे. त्यामुळेच प्रियंका पुढे चालताना मागे काही मीटर अंतरापर्यंत हा कोट अक्षरशः रस्ता झाडत येतो. सेलिब्रेटींनी घातलेला हा कोट सांभाळण्यासाठी खास एका सहाय्यकाची नेमणूक करावी
लागते.
फॅशन परेडमध्ये प्रियंकाचा हा इव्हनिंग गाऊन चर्चेचा किंबहुना कौतुकाचा विषय होता. मात्र तिचा हा झगा सर्वसामान्यांच्या काही पचनी पडला नाही. प्रियंकाची खिल्ली उडवण्यापासून तिच्यावरचे विनोद असोत, किंवा एकूणच सिच्युएशनल जोक्स असोत, प्रियंका ट्विटरवर काही काळ ट्रेण्डिंगमध्ये राहिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही विनोद :
https://twitter.com/IamBhumikaC/status/859310719145197568
https://twitter.com/TheRobustRascal/status/859299489340837889
https://twitter.com/SirJadeja/status/859298963857559552
https://twitter.com/SirJadeja/status/859295718779084800
https://twitter.com/AksharPathak/status/859282998168047617
https://twitter.com/aj_mindspark/status/859285236005429253
https://twitter.com/ikpsgill1/status/859282233433051136
https://twitter.com/namitahanda/status/859265042969243649