Ravi Kishan :  अभिनेते आणि भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवी किशन (Ravi Kishan) यांची डीएनए चाचणी करावी अशी मागणी करणारी याचिका त्यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवा हिने कोर्टात दाखल केली होती. सकाळच्या सुमारास याचिकेवर सुनावणी पार पाडल्यानंतर आता कोर्टाने निकाल दिला आहे. रवी किशन यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. 


रवी किशन यांची कथित मुलगी शिनोवाने मुंबईतील गोरेगाव-दिंडोशी कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने रवी किशन हे वडील आहेत की नाही यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे तिने कोर्टात याचिका दाखल करत तिला अधिकृतरित्या रवी किशन यांच्या मुलगी म्हणून स्वीकारण्यात यावं अशी देखील मागणी केली. दाखल याचिकेवर आज कोर्टाने निकाल देताना शिनोवाची  याचिका फेटाळून लावली. 


 अभिनेता रवी किशनने अपर्णा ठाकूर आणि शिनोवाचे दावे आधीच फेटाळून लावले. आता कोर्टाच्या निर्णयाने रवी किशन यांना दिलासा मिळाला आहे. 






 


शिनोवाने याचिकेत कोणत्या मागण्या ?


शिनोवाने या याचिकेत ती रवी किशन यांची बायोलॉजिकल मुलगी असल्याचं घोषित करण्यात यावं अशी मागणी केली होती. तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला नाही याची खात्री करण्यासाठी, न्यायालयाने देखील एक आदेश (आदेश) जारी केला पाहिजे.याशिवाय, त्यांनी अपर्णा सोनी उर्फ ​​अपर्णा ठाकूर आणि इतरांविरुद्ध उत्तर प्रदेशात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे शिनोवाने DNA चाचणी करण्याची देखील मागणी यामध्ये केली. 


प्रकरण काय?


अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत रवि किशन यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी या महिलेने स्वत: भाजप खासदाराची पत्नी असल्याचा दावा देखील केला. तसेच त्यांना एक मुलगी असून त्यांच्या मुलीला तिचे हक्क द्यायचे असल्याचं देखील या महिलेने म्हटलं आहे. 1996 मध्ये त्यांचं लग्न झाले होते. त्यांच्या लग्नात कुटुंबीय आणि मित्रमंडळी देखील सहभागी झाले असल्याचा दावा अपर्णाने केला होता. दरम्यान रवि किशन यांची मुलगी असल्याचा दावा आपल्या मुलीला तिचे हक्क मिळत नसल्याने पत्रकार परिषद घेत असल्याचं या महिलेने म्हटले आहे. 


रवी किशन यांच्या पत्नीने दाखल केली तक्रार


अपर्णा ठाकूर यांनी रवी किशन यांच्यावर आरोप केल्यानंतर रवी किशनची पत्नी प्रीती शुक्ला यांनी   लखनौमधील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 195 (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे), 386 (खंडणी) आणि 504 (हेतूपूर्वक अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.