मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार सैन्यातील जवान किंवा शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कायमच तत्पर राहिला आहे. लष्कराच्या कल्याणासाठी 1 टक्के सेस आकारावा, अशी मागणी अक्षय कुमारनं केली आहे.


'सैन्याला सुविधा मिळाव्यात, यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाकडून 0.5 ते 1 टक्का करवसुली करण्यात यावी. ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानासाठी सेस आकारला जातो, त्याप्रमाणे लष्करातील जवानांसाठी 'आर्मी वेल्फेअर सेस' लागू करावा', अशी मागणी त्याने केली.

मुंबईत झालेल्या 18 व्या कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात अक्षयनं सरकारकडे ही मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

अक्षयच्या संकल्पनेतील जवानांच्या वेबसाईटला देणाऱ्यांचे हजारो हात


bharatkeveer.gov.in (भारतकेवीर.जीओव्ही.इन) ही वेबसाईट अक्षय कुमार आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आली आहे. निम्नसैनिक दलातील कोणत्याही शहीद जवानाच्या कुटुंबीयांना या वेबसाईटच्या माध्यमातून थेट मदत (15 लाख रुपयांपर्यंत) करता येते.