अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला शिवराळ ट्वीट, चौघांवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2017 10:15 AM (IST)
अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीविरोधात शिवराळ ट्वीट करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : गायिका-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने ट्विटरवर अझानविरोधी सूर आळवल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र सुचित्राविरोधात शिवराळ ट्वीट करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'कभी हां कभी ना' चित्रपटात शाहरुखसोबत झळकलेल्या सुचित्रा कृष्णमूर्तीने काही दिवसांपूर्वी लाऊडस्पीकरवर अझान ऐकावं लागत असल्यामुळे सकाळ-सकाळी शांततेचा भंग होत असल्याची भावना ट्विटरवर व्यक्त केली होती. https://twitter.com/suchitrak/status/888914947823902720 सुचित्राच्या ट्वीटवर अनेक नेटिझन्सनी तोंडसुख घेतलं. त्यापैकी शिवराळ भाषेत ट्वीट करणाऱ्यांविरोधात सुचित्राने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला.