रविना टंडन काय म्हणाली?
शेतकरी आंदोलनाच्या एका बातमीवर कमेंट करत रविनाने ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये शेतमाल फेकून देतानाची दृष्य दिसत होती.
"अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणं दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.", असं ट्वीट रविना टंडनने केलं होतं.
रविनाचं स्पष्टीकरण
या ट्वीटनंतर रविना टंडनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र त्यानंतर तिने एबीपी माझाकडे स्पष्टीकरण देत आपला रोष हा शेतकऱ्यांविरोधात नसल्याचं सांगितलं.
''मी शेतकऱ्यांप्रती नेहमीच संवेदनशील आहे, माझी टाईमलाईन तुम्ही चेक करा, शेतकरी आत्महत्या असो किंवा कर्जबाजारीपणाचा विषय असो, नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. पण शेतमालाची जी नासधूस होत आहे, त्याविरोधात रोष आहे,'' असं रविनाने सांगितलं.