संजीव श्रीवास्तव यांचा डान्स पाहून गोविंदा फारच खूश आणि प्रभावित झाला. गोविंदा म्हणाला की, "मला कोणीतरी हा व्हिडीओ पाठवला आणि तो मला आवडलाही. हा व्हिडीओ मी पत्नी सुनीतालाही दाखवला. या गाण्याला एवढी वर्ष झाली आणि अनेक वर्षांनंतर एका व्यक्तीने ते गाणं पुन्हा लोकप्रिय केलं आहे. यासाठी मी त्याचे आभार मानतो. हा डान्सचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या स्टेपवर लक्ष देण्याऐवजी ते गाणं आणि नाचण्याचा आनंद लुटत होते. व्हिडीओ पाहून मला वाटलं की, हे गोविंदाची चांगली कॉपी करत आहेत."
"तुमचा डान्स पाहून मला फार आनंद झाला. अशीच धम्माल करत राहा. ज्या पद्धतीने तुमची पत्नी साथ देत होते, तेही मला आवडलं," असंही गोविंदा म्हणाला.
कोण आहेत नाचणारे काका?
एका लग्नातील जबरदस्त डान्समुळे सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या या काकांचा पत्ता लागला आहे. भन्नाट डान्स करणाऱ्या या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव असून ते मध्य प्रदेशच्या विदिशात राहतात. डब्बू अंकल म्हणून त्यांना ओळखलं जातं. ग्वाल्हेरमध्ये 12 मे रोजी मेहुण्याच्या लग्नाच्या संगीतातील हा डान्सचा व्हिडीओ आहे.
नागपूर विद्यापीठ आणि नागपूरच्याच प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेले संजीव श्रीवास्तव भाभा इंजिनिअरिंग रिचर्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात.
मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदाकडून डान्सची प्रेरणा मिळाली. पण गोविंदाच्या गाण्यावर जास्त डान्स केले. कॉलेजमध्ये असताना स्टेजवर डान्स करायचो. पण 1998 मध्ये डान्स करणं बंद केलं होतं, असं संजीव श्रीवास्तव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. सध्याच्या काळात हृतिक रोशनचा डान्स आवडतो, तो कम्प्लिट डान्सर आहे. त्याच्या 'कहो ना प्यार है' गाण्याच्या स्टेपवर डान्स केला होता, असंही ते म्हणाले.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतत कॉल येत असल्याचंही संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं.
व्हायरल झालेला डान्स
संबंधित बातम्या
डान्सिंग अंकलला विदिशा महापालिकेचं मोठं गिफ्ट
गोविंदासारखा डान्स करणाऱ्या काकांचा पत्ता लागला!
'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स