मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन हे एक्स लव्हर्स छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. काही वृत्तानुसार, आगामी कॉमेडी शोसाठी अक्षय आणि रवीनाने जुन्या गोष्टी विसरुन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टार प्लसवर लवकरच सुरु होणाऱ्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या नव्या मोसमात जजच्या भूमिकेत दिसतील. जज पॅनलसाठी अक्षय कुमार आधीच फायनल होता. आता रवीनानेही जज बनण्यासाठी होकार दिला आहे.
रवीना आणि अक्षयची लव्हस्टोरी 'मोहरा' (1994) चित्रपटादरम्यान सुरु झाली होती. दोघेही पंजाबी होते आणि सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती.
अनेक कार्यक्रमांना दोघे एकत्र दिसत असता. हे दोघे लवकरच लग्नाची घोषणा करतील, असं बॉलिवूडमधील सगळ्यांना वाटत होतं.
1999 मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने कबूल केलं होतं की, अक्षयने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. इतकंच नाही तर अक्षय आणि तिने मंदिरात साखरपुडाही केला होता.
पण अक्षयला त्याच्या करिअर आणि महिला फॅन्सना गमावण्याची भीती वाटत होती, म्हणजून त्याने ही बाब स्वीकारली नाही, असंही रवीनाने सांगितलं होतं.
1996 मध्ये अक्षय, रवीना आणि रेखा यांचा 'खिलाड़ियों का खिलाड़ी' चित्रपट रिलीज झाला. यावेळी मीडियात अक्षय आणि रेखा यांची लव्हस्टोरी चर्चेत होती. रवीना आधीच अक्षयच्या रंगेलपणाला कंटाळली होती. त्यातच रेखासोबत त्याचं नाव जोडल्याने ती दुखावली आणि नंतर ब्रेकअप केलं.