निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
जर्मनीतील मोदी भेटीवेळीच्या प्रियंका चोप्राच्या ड्रेसवर चहूबाजूंनी टीका
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2017 10:19 AM (IST)

फोटो सौजन्य : प्रियंका चोप्रा इंस्टाग्राम अकाऊंट
बर्लिन : आपल्या नवनवीन ड्रेसेसमुळं बॉलिवूडची देसी गर्ल नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण सध्या मोदी भेटीवेळी तिनं परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. सध्या प्रियंका चोप्रा आपल्या आगामी बेवॉच सिनेमाच्या प्रमोशनसाठी जर्मनीत आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही चार दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या निमित्त जर्मनीत आहेत. त्यामुळे काल प्रियांका चोप्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची जर्मनीतल्या बर्लिनमध्ये भेट घेतली. प्रियांका चोप्रानं मोंदींसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तसंच आपल्या भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारही तीनं मानले होते. पण यावेळी तीनं घातलेल्या पांढऱ्या वन पीसवरून सोशल मिडियावर तीची खिल्ली उडवण्यात आली आहे. तिची हेअरस्टाईल, लीपस्टीक आणि मेकअपवरूनचं सोशल मिडियावर चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियात आपले फोटो ट्रोल होत असल्याचे पाहून नेटीझन्सला प्रियंकानं प्रत्युत्तर दिलं आहे. इंस्टाग्रामवर तिनं आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करुन प्रतिकात्मक संदेश दिला आहे.