Rasika Dugal : गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ओटीटीमुळे लोकप्रियता मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. गेली 13 वर्ष बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी, प्रसिद्धीसाठी झगडणारी अभिनेत्री रसिका दुगलला (Rasika Dugal) ओटीटीने चांगलीच प्रसिद्धी दिली.
नुकत्याच एका कार्यक्रमात रसिकाने बॉलिवूडमध्ये कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली,"बॉलिवूडमध्ये 13 वर्षात जी प्रसिद्धी मिळाली नाही ती ओटीटीने दिली आहे. ओटीटीने मला खूप काही गिलं आहे".
मिर्झापूर या वेबसीरिजने रसिकाला लोकप्रियता मिळाली. या वेबसीरिजविषयी ती म्हणाली,"मिर्झापूरमधील भूमिकेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. बीना त्रिपाठीची भूमिका साकरताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या दमदार अभिनयाने रसिकाने बीना त्रिपाठी हे आयकॉनिक पात्र साकारले.
रसिका दुगल कोण आहे?
रसिका दुगलचा जन्म झारखंडमध्ये झाला. पण तिने उच्च शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. दिल्लीत राहून तिने अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला. अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर रसिका मुंबईत आली. 2007 पासून तिच्या करिअरचा टप्पा सुरू झाला. त्याच वर्षी रसिकाला अन्वर हा पहिला चित्रपट मिळाला. यामध्ये तिची छोटीशी भूमिका होती. या चित्रपटानंतरही ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. परंतु तिला सर्व चित्रपटांमध्ये फक्त छोट्या भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर 2018 हे वर्ष तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले.
2018 मध्ये मिर्झापूर वेब सिरिजचा पहिला भाग ओटीटीवर रिलीज झाला. मिर्झापूरला प्रेषकांनी डोक्यावर घेतले. रसिकानेही मिर्झापूरमध्ये आपली भूमिका चोख निभावली होती.
संबंधित बातम्या