मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका धबडगांवकर ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. अखेर रसिका धबडगांवकरनेच एबीपी माझाच्या 'ढॅण्टॅढॅण' टीमकडे या चर्चांसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.
नव्या वर्षात रसिकाचे दोन सिनेमे रिलीज होणार असल्यामुळे ती या मालिकेचा निरोप घेणार आहे असं बोललं जात होतं. मात्र या सर्व बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं शनायाने ढॅण्टॅढॅणच्या टीमला सांगितलं.
"या मालिकेने मला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून दिलं आहे. त्यामुळे मालिका सोडणार नाही.", असे शनाया म्हणजेच रसिका धबडगांवकरने स्पष्ट केले.
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका मराठी प्रेक्षकांमध्ये कमालीची प्रसिद्ध आहे. पसंतीच्या शिखरावर असलेल्या या मालिकेने नुकतंच 100 भाग पूर्ण केले आहेत.