Rashmika Mandanna : ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या बहुचर्चित चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. तेव्हापासून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या निवडीबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अशी चर्चा होती की, दीपिका पदुकोण (Deepika Padukone), क्रिती सेनन (Kriti Sanon) किंवा श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यापैकी एक या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकू शकते. मात्र, त्यानंतर रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) देखील या असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता रश्मिकाने या शर्यतीत बाजी मारल्याचे दिसते आहे.
या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीविषयी बरीच चर्चा रंगली होती. बॉलिवूडमधील अनेक चर्चित चेहऱ्यांची नावं आघाडीवर होती. मात्र, आता या चित्रपटात रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे समोर येत आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रश्मिकाने मारली बाजी
या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकेल याची चर्चा चित्रपटाच्या घोषणेपासूनच सुरु झाली होती. याआधी या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण आणि क्रिती सेनन यांची नावे चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या चित्रपटासाठी रश्मिका मंदनाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आता या चित्रपटात रश्मिका कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याआधी अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘आशिकी 2’मध्ये दिसले होते. या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटातील गाणी बराच काळ लोकांच्या मनावर राज्य करत होती.
‘आशिकी’ची हिट फ्रँचायझी
1990 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिकी’ हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर दोघेही रातोरात प्रसिद्ध झाले. यानंतर 2013 मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी 2’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
सध्या कार्तिक आर्यन अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहेत.
हेही वाचा :