Vikram Vedha Review : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राधिका आपटे (Radhika Aapte) स्टारर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘विक्रम वेधा’च्या आगाऊ बुकिंगनुसार, चित्रपट पहिल्या दिवशी चांगले कलेक्शन करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अशा परिस्थितीत केआरकेने (KRK) चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल ट्विट केले आहे. त्याचवेळी केआरकेने ‘विक्रम वेधा’चा रिव्ह्यू देखील दिला आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये या चित्रपटाची अ‍ॅक्शन भोजपुरी चित्रपटांपेक्षा वाईट असल्याचे म्हटले आहे.


केआरकेने अर्थात कमाल राशिद खान याने ट्विटरवर ‘विक्रम वेधा’चा रिव्ह्यू दिला आहे. मात्र, आपण नाही तर आपल्या मित्राने हा चित्रपट पाहिल्याचे त्याने म्हटले आहे. केआरकेने ट्विटमध्ये लिहिले की, 'माझ्या मित्राने विक्रम वेधाला पाहिला. चित्रपटाच्या पूर्वार्धात हृतिक रोशन अमिताभ बच्चन आणि उरलेल्या अर्ध्या भागात अल्लू अर्जुनची कॉपी करताना दिसत आहे. क्लायमॅक्समध्ये हृतिक आणि सैफ अली खान 15 मिनिटे हवेत गोळीबार करत राहतात. चित्रपटाची अॅक्शन भोजपुरी चित्रपटांपेक्षा वाईट आहे. हा चित्रपट आऊटडेटेड असून, तीन तासांचा छळवाद आहे.’


पाहा पोस्ट :



कलेक्शनबद्दलही केले भाकीत


त्यानंतर केआरकेने चित्रपटाबाबत आणखी तीन ट्विट केले  आहेत. त्याच्या पहिल्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले की, विजय सेतुपती आणि आर माधवन स्टारर मूळ ‘विक्रम वेधा’ अजूनही एमएक्स प्लेयरवर मोफत उपलब्ध आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने चित्रपटाच्या कलेक्शनबाबत अंदाज व्यक्त केला आहे. KRK ने लिहिले, 'अंदाजे फक्त 39 टक्के लोकांना विक्रम वेध बघायचा आहे, याचा अर्थ चित्रपट पहिल्या दिवशी 8-10 कोटी रुपये कमवू शकतो.'



तमिळ ‘विक्रम वेधा’चा अधिकृत रिमेक


हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट आज चित्रपटगृहात रिलीज झाला झाला. या दोन्ही स्टार्सचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते आणि चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडेही चांगले आहेत. हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ हा त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे, ज्यात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ‘विक्रम वेधा’ची कथा भारतीय पौराणिक कथा ‘विक्रम वेताळ’वरून प्रेरित आहे. या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये, विक्रमची भूमिका माधवनने आणि वेधाची भूमिका विजय सेतुपतीने केली होती. तर, हिंदीमध्ये माधवनच्या जागी सैफ, तर विजयची जागा हृतिक रोशनने घेतली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!


Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..