Dipeeka Padukone with Ranveer Singh Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) विविध सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Dipeeka Padukone) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिका मुलाखत देत आहे. मुलाखतीदरम्यान दीपिका पदुकोणला सरप्राइज देण्यासाठी रणवीर पोहोचला आहे. रणवीरला पाहून दीपिका थक्क झाली. दीपिका टाइम मॅगझिनसाठी फोटोशूट करण्यासाठी आली होती. यादरम्यान, रणवीरनं दीपिकाला सरप्राइज दिलं.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलाखतीमध्ये दीपिकाला लग्नाबाबत एक प्रश्न विचारला जातो आणि त्याच दरम्यान रणवीर तिथे पोहोचतो. रणवीर आणि दीपिका हे एकमेकांना किस करतात. दीपिका आणि रणवीर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुढे व्हिडीओमध्ये दीपिका म्हणते, 'मला माझ्या पतीसोबत वेळ घालवायला आवडते. मी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न केले आहे.' या व्हायरल व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीरच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
दीपिका आणि रणवीरचे आगामी चित्रपट
दीपिकाच्या (Dipeeka Padukone) पठाण (Pathaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आता दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' आणि फायटर सारख्या चित्रपटात दिसणार आहे. तर गेल्या वर्षी रणवीरचा 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रणवीर हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबतच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील काम करणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला नेटकऱ्यांनी पसंती मिळते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: