Viral Video :  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir)  या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' (Baharla Ha Madhumas) हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.  अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. फक्त भारतातील नाही तर परदेशातील लोकांना देखील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याची भूरळ पडली आहे.काही दिवसांपूर्वी टांझानियाच्या किली पॉलनं या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता.  तसेच  सोशल मीडिया स्टार रिकी पाँडनं (Ricky Pond)  देखील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता.  आता दोन जपानी कलाकारांनी 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावरील रिल शेअर केलं आहे. या रिलमधील या जपानी डान्सरच्या हटके अंदाजाला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


काकेताकु नावाच्या जपानी कलाकारानं 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच पिरो PIRO असं नाव असणारी जपानी डान्सर देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा व्हिडीओ: 






काकेताकु इन्स्टाग्रामवर 313K एवढे फॉलोवर्स आहेत. काकेताकु हा सोशल मीडियावर हिंदी  गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी काकेताकुनं रामलीला या चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. 






महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.   या चित्रपटात अंकुश चौथरीसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Viral Video : किली पॉलचा मराठमोळा अंदाज, बहिणीसोबत थिरकला 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर; नेटकरी म्हणाले, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना...'