83 Movie : '83' सिनेमा 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच सिनेमाचे निर्माते शिबाशीष सरकार यांनी दिल्लीत '83' चित्रपट करमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) '83' सिनेमाची रणवीरचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते.  या सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे.






दिल्लीतील क्रिकेटप्रेमी आणि सिनेमाप्रेमींसाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. दिल्लीत '83' चित्रपट करमुक्त करणार असल्याने दिल्लीत '83' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे.






दीपिका या चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावर 83 चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट 3D मध्ये पहायला मिळणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.  83 हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. 83 चित्रपटासोबतच रणवीरचे तख्त, अनियन आणि  रॉकी और रानी की प्रेम कहानी हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.


संबंधित बातम्या


83 Movie Review : विश्व विजयाची रोमांचकारी गाथा


R Madhavan : ...अन् आर माधवन नमाज पढत असलेल्या व्यक्तीच्या शेजारी गायत्री मंत्राचा जप करू लागला; जाणून घ्या काय आहे ही घटना


R Madhavan on 3 Idiots : आर. माधवन आणि चेतन भगतमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha