मुंबईः खास आपल्या करामती शैलीसाठी ओळख असलेला अभिनेता रणवीर सिंह सुलतानच्या गाण्यावर थिएटरमध्येच जोरदार नाचला. रणवीरला सुलतान सिनेमा एवढा आवडला की तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि जागेवरच नेहमीप्रमाणे धिंगाणा सुरु केला.

 

सुलतानमधील 'बेबी को बेस पसंद हैं' हे गाणं लागल्यानंतर रणवीरने थिएटरमध्येच नाचायला सुरु केलं. रणवीर सध्या बेफिक्रेच्या शुटींगसाठी पॅरिसमध्ये आहे. तिथे त्याने सुलतान पाहिला. यावेळी रणवीरला पाहून थिएटरमधील प्रेक्षकांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर होत आहे.

 

सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड सेलेब्रिटींनीही या सिनेमाला चांगलीच पसंती दिली आहे. याचा प्रत्यय नुकताच पॅरिसमधील सिनेमागृहात आला.

 

पाहा व्हिडिओः


https://twitter.com/RanveeriansFC/status/752293394756542464