Ranveer Singh vs Deepika Padukone Net Worth : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) याचं नाव सामील आहे. रणवीर सिंहने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. 'लुटेरा' असो, 'बाजीराव मस्तानी' किंवा मग 'पद्ममावत'मधील अलाउद्दीन खिलजीची भूमिका, त्याने सर्व व्यक्तिरेखा चोख निभावल्या आहे. अभिनेता रणवीर सिंह 6 जुलै रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांना बॉलिवूडचं पावर कपल (Power Couple) म्हटलं जातं. रणवीरच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घ्या.
रणवीर सिंहची एकूण संपत्ती किती?
'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'सिम्बा' आणि 'गली बॉय' यांसारख्या हिट चित्रपटानंतर रणवीर सिंहने आपल्या मानधनात वाढ केली आहे. रणवीर सिंह प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 30 ते 40 कोटी रुपये इतकी मोठी फी आकारतो. याशिवाय अनेक ब्रँड्ससोबतही त्याने काम केलं आहे. सियासत डॉटकॉमनुसार, रणवीर सिंह एकूण संपत्ती सुमारे 362 कोटी रुपये आहे.
दीपिकाची संपत्ती रणवीरपेक्षा दुप्पट (Deepika Padukone Net Worth)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण एका महिन्यात 3 कोटी रुपये कमवते. एका चित्रपटासाठी दीपिका 30 कोटी रुपये मानधन घेते. तिचं मासिक उत्पन्न 3 कोटी रुपये आहे, तर ती वर्षाला 40 कोटी रुपये कमावते. दीपिका पदुकोणची एकूण नेटवर्थ तिचा पती रणवीर सिंगपेक्षा दुप्पट आहे. दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 500 कोटींच्या आसपास आहे
दीपिका पदुकोणचं प्रोडक्शन हाऊस
अभिनयाव्यतिरिक्त दीपिका पदुकोण स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवते. दीपिकाच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव 'का प्रॉडक्शन' आहे. या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात तिने 2018 साली केली होती. आतापर्यंत दीपिकाच्या या प्रोडक्शन हाऊसने '83' आणि 'छपाक' हे सिनेमे केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री दीपिकाची एकूण संपत्ती सुमारे 500 कोटी रुपये आहे.
पॉवर कपलची एकूण नेटवर्थ (Ranveer Singh & Deepika Padukone Net Worth)
रणवीर आणि त्याची पत्नी दीपिकाने मुंबईतील सर्वात आलिशान भागात 119 कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. अलिबागशिवाय खार आणि प्रभादेवीमध्येही त्यांचा एक व्हिला आहे, ज्याची किंमत 22 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या पॉवर कपलची एकूण संपत्ती 862 कोटी रुपये आहे.