मुंबई: रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण रिसेप्शनसाठी आज सकाळी मुंबईहून बंगळुरुला रवाना झाले आहेत. दीपवीर लग्नानंतर उद्या ( 21 नोव्हेंबर ) बंगळुरुमध्ये ग्रॅंड रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शची तयारी सुरु झाली आहे.
दीपिका दक्षिण भारतीय असल्याने तिचे अनेक नातेवाईक हे बंगळुरुमध्ये राहतात. त्यांच्यासाठी खास रिसेप्शन देण्यात येत आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत शानदार रिसेप्शन दिलं जाणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील अभिनेते उपस्थित राहतील.
बंगळुरुला रवाना होण्यापूर्वी रणवीर-दीपिकाने मीडियासाठी पोज दिल्या. यावेळी रणवीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता , तर दीपिकाने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता.