मुंबई : मागील काही दिवसांमध्ये एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्राची मुलगी आदिराचा असल्याचं म्हटलं जात आहे.
हा फोटो राणी मुखर्जीच्या मुलीचा असल्याचा समजून लोक तो शेअर तसंच लाईक करत आहेत. मात्र यावर राणीकडून अधिकृत निवेदन आलं आहे.
राणी मुखर्जीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, "राणी मुखर्जी कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर नाही. शिवाय यापुढीही ती नसेल. तिच्या नावाने सुरु असलेले अनेक फेक अकाऊंट आम्ही बंद करत आहोत. आमची सर्वांना विनंती आहे की, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. कारण त्यावरील माहिती पूर्णत: चुकीची आहे."
अशीच घटना ऐश्वर्या राय बचच्न आई बनली त्यावेळी घडली होती. दुसऱ्या एका बाळासह ऐश्वर्याचा फोटो व्हायरल होत आहे. ही मुलगी ऐश्वर्याची असल्याचा दावा या फोटोद्वारे केला जात होता. पण सत्य वेगळंच होतं. हा फोटो तिच्या मुलीचा नव्हता. तर तो मॉर्फ करुन शेअर केला जात होता.